मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करताना गांधी यांनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांचा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. त्यावरुन मोदी आज दोन्ही सभागृहात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलणार आहेत.
PM Reply To Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अदानींबद्दल सरकारवर केलेल्या आरोपावरांवर पंतप्रधान काय बोलणार? - हिंडनबर्ग रिपोर्ट
राष्ट्रपती अभिभाषणावर आज पंतप्रधान मोदी उत्तर देणार आहेत. लोकसभा तसेच राज्यसभामध्ये यामुळे गदारोळ होण्याची शक्याता आहे. गौतम अदानी आणि हिंडनबर्ग रिपोर्टवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्यावर मोदी आज विरोधकांना उत्तर देण्याची शक्याता आहे.
काय म्हणाले राहुल गांधी ? :राहुल गांधी म्हणाले की, अदानी समूह कोणत्याही व्यवसायात उतरतो आणि यश मिळवतो. तसेच, अदानी पूर्वी एक किंवा दोन व्यवसाय करत होते. परंतु, आता ते आठ-दहा क्षेत्रात काम करतात. यामध्ये विमानतळ, डेटा सेंटर, सिमेंट, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, एरोस्पेस आणि संरक्षण, ग्राहक वित्त, अक्षय, मीडिया आणि पोर्ट यांचा समावेश आहे. या सर्व विषयांवर बोलताना पंतप्रधानांना प्रश्न करत राहुल यांनी विचारले, 2014 मध्ये अदानी यांची संपत्ती 8 अब्ज डॉलर होती, ती 2022 मध्ये 140 अब्ज डॉलर कशी झाली? त्यावर मोदी आज काही बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.