पालघर- जिल्ह्यात भाजपकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शेतकरी विषयी विविध योजना आणि उपक्रमाची माहिती शेकऱ्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी भाजपकडून 140 ठिकाणी केंद्र तयार करण्यात आली होती.
54 हजार रुपये पीकविमा मिळालेल्या राज्यातील शेतकऱ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद - लातूरचा शेतकरी मन की बातमध्ये
17:26 December 25
'मन की बात'साठी पालघरमध्ये भाजपकडून 140 ठिकाणी केंद्र
17:04 December 25
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद
लातूर- 2019 च्या खरीप हंगामातील तीन हेक्टरवरील सोयाबीनच्या पीक विम्यापोटी 2 हजार 500 रुपये अदा केले असता या बदल्यात औसा तालुक्याच्या मातोळा येथील शेतकरी गणेश भोसले यांना चक्क 54 हजार रुपये मिळाले होते. त्याअनुषंगाने शुक्रवारी 'मन की बात' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात या गणेश भोसले यांना संवाद साधता आला आहे. यामध्ये पीक विमा रकमेबरोबरच इतर शेती निगडित व्यवसायाशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. 'मन की बात'मध्ये संवाद साधणारे गणेश भोसले यांच्याशी केलेली विशेष चर्चा...