मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी शरद पवारयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या (birthday wishes to Sharad Pawar) आहेत.
खासदार उदयनराजे भोसले :राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना ८२ व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत दीर्घायुष्य चिंतले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने साताऱ्यातील भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत दीर्घायुष्य चिंतले आहे.
मागील वर्षी दिल्लीत भेट :उदयनराजेंनी गतवर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उदयनराजे दिल्लीत होते. त्यामुळे गुलाबाचा गुच्छ घेऊन शरद पवारांना त्यांनी थेट शुभेच्छा दिल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) :श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) : महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व खासदार श्री.शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
धीरज देशमुख :महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो, हीच प्रार्थना, असे ट्विट करत धीरज देशमुख यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या (politician given birthday wishes to Sharad Pawar) आहेत.
प्रफुल्ल पटेल :आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे समर्पण, दृढनिश्चय आणि दृष्टी आम्हाला नेहमीच समाजासाठी आमचे सर्वोत्तम देण्यास प्रेरित करते. तुमचे मार्गदर्शन आणि मार्गदर्शन घेऊन आमचे नेतृत्व करत रहा. देव तुम्हाला उदंड आनंद, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, असे ट्विट करत प्रफुल्ल पटेलयांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.