महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Modi Thackeray Posters : बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे मोदी झुकल्याचे पोस्टर मुंबईत झळकले - मोदी झुकल्याचे पोस्टर मुंबईत झळकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आजच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईसाठी ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन करणार आहे. शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात मोदी बाळासाहेबांसमोर झुकल्याचे पोष्टर लक्षवेधुन घेत आहे.

Pm Narendra Modi And Balasaheb Thackeray
पंतप्रधान मोदी झुकल्याचे पोस्टर मुंबई झळकले

By

Published : Jan 19, 2023, 12:21 PM IST

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लक्ष वेधत आहे. दक्षिण मुंबईच्या मरीन लाईन आणि गिरगाव भागामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा हात पकडून नरेंद्र मोदी झुकले आहेत असे पोस्टर लावण्यात आलेला आहे. या पोस्टरवर कोणाचाही नाव लिहिण्यात आलेले नाही. कोणत्याही पक्षाचा उल्लेख नाही. मात्र या पोस्टर मधून तो संदेश मुंबईकरांना द्यायचा होता तो अचूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नरेंद्र मोदीगुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी असा निर्णय घेऊ नये. असा आग्रह बाळासाहेब ठाकरे यांनी धरला होता. त्यावेळी मोदी यांचे मुख्यमंत्री पद वाचले होते. त्यामुळे आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत असा सांगण्याचा प्रयत्न या पोष्टरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या आधीही बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मोदी पंतप्रधान होऊ शकले याचा उल्लेख वारंवारत ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.



मातोश्री परिसरातही बॅनरबाजी :पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असल्याने सर्व मुंबईभर बॅनरबाजी केली जात आहे. मात्र यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरामध्ये कलानगर येथे देखील मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या परिसरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांचे मोठ मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच यात बाळासाहेब ठाकरे यांच्या कटआउटचाही समावेश आहे.

बीकेसीवर जाहीर सभा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच, मुंबई पोलिसांकडूनही हा दौरा व्यवस्थित होण्यसाठी विषेश तयारी करण्यात आली आहे. येथील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते मेट्रो ७चे उद्घाटन करणार आहेत. या सर्व कार्यक्रात मुंबई पोलिसांनी ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईटर, एअरक्राफ्ट हे संसाधन वापरण्यावर बंदी घातली आहे.


हेही वाचा :PM Modi Mumbai Visit सत्तांतरानंतर पंतप्रधान मुंबईत प्रथमच होणार दाखल मेट्रोसह अनेक कामांचे करणार लोकार्पण वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details