महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी योजनांचा 'श्री गणेशा' - पंतप्रधान मोदी

आज गणेशोत्सवाच्या काळात मुंबई येथून महाराष्ट्रासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजनांचा श्री गणेशा होत आहे. तब्बल २० हजार कोटी रूपयांचे काम आज येथे सुरू होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी

By

Published : Sep 7, 2019, 1:05 PM IST

Updated : Sep 7, 2019, 2:50 PM IST

मुंबई - आज गणेशोत्सवाच्या काळात मुंबई येथून महाराष्ट्रासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजनांचा श्री गणेशा होत आहे. तब्बल २० हजार कोटी रूपयांचे काम आज येथे सुरू होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुंबईकरांना संबोधित करत होते. ते म्हणाले, आज मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिकांसाठी सुवर्ण क्षण आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी गतीमान होणार आहे. मुंबईच्या गतीमुळे या देशाला गती मिळाली आहे. मागील पाच वर्षांपासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सरकारने खूप प्रयत्न केले आहे.

पाच वर्षांत ४०० किमी मेट्रोचे जाळे

आज देशात पावणे सातशे किमी मेट्रोचे जाळे पसरले असून त्यापैकी सुमारे ४०० किमी मेट्रोचे जाळे केवळ ५ वर्षांत पसरले आहे. सध्या ८५० किमी मेट्रोसाठी देशभरात काम सुरू आहे. मुंबईत सध्या ११ किमीचा मेट्रो ट्रॅक आहे. पण, हे २०२३ सव्वातीनशे किलोमीटरचा होईल, असेही त्यांनी सांगितले. याचा सर्वाधिक फायदा मुंबईकरांना होणार आहे.

मेट्रोचे डबे मेक इन इंडिया अंतर्गत

आज मुंबईच्या लोकलमधून जेवढी लोकं प्रवास करतात तेवढेच लोक मेट्रोने प्रवास करतील असा उद्देश आहे. मेट्रोचे सर्व डबे हे मेक इन इंडीया कार्यक्रमांतर्गत भारतातच तयार करण्यात आले आहे. याचा आपणास अभिमान असायल हवा, असे मोदी म्हणाले.

५० हजार लोकांना रोजगाराच्या संधी

- या मेट्रो प्रकल्पांमुळे १० हजार अभियंते आणि ४० हजार लोकांना कुशल आणि अर्धकुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

जलप्रदुषण मुक्तीसाठी संकल्प

मुंबईसह महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतेही संकल्प आपण घेतले पाहिजे. बाप्पाच्या विसर्जनावेळी प्लास्टिक आणि टाकाऊ पदार्थ समुद्रात जातो. यावेळी आपणास संकल्प करायचे आहे, की ज्यापासून जलप्रदुषण होईल, अशा वस्तू पाण्यात टाकायच्या नाहीत. एवढेच नाही विसर्जनानंतर आपापल्या परीने नद्यांना प्रदुषणमुक्त करण्यासाठी एकत्रित यावे, असे संकल्प मोदींनी उपस्थिताकडून करून घेतले.

Last Updated : Sep 7, 2019, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details