मंत्री शंभूराज देसाई यांची ईटीव्ही भारतला मुलाखत मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. मंत्री शंभूराज देसाईंची चर्चा केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी राज्यभरात आरोग्य दिन साजरा करायचा निर्णय घेतला आहे. राज्यभर आरोग्य शिबिर, आरोग्य मेळावे, वैद्यकीय तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, गरिब-वैद्यकीय रुग्णांना मदत असे समाजोपयोगी कामे राज्यातील जिल्हा-जिल्ह्यात राबवत आहोत. अनेक ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखांचे उद्घाटन केले जात आहेत. अशा पद्धतीने समाजपयोगी कामे करून समाजाला काही चांगले देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देसाई म्हणाले.
राज्याला वेळोवेळी केंद्राचे सहकार्य:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पात शेतकरी वर्ग, आरोग्य, शैक्षणिक विभाग, पाणी आदी विषयांवर काय तरतूदी असतील. जनतेला कशा प्रकारे दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असा प्रश्न देसाईंना विचारला. राज्याचा अर्थसंकल्प यायला अवधी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारित हा विषय येतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. आता हळूहळू आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. केंद्राचे सहकार्य राज्याच्या मॅचींग ग्रँड स्वरूपात मिळत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी अर्थसंकल्प सादर करतील, अशी माहिती देसाईंनी दिली.
राज्यातील समस्या मांडण्याची संधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांना मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विरोधकांनी जोरदार यावर टीकास्त्र सोडत आहेत. मंत्री शंभूराज देसाईंनी त्याला प्रत्युत्तर दिले. वंदे भारत रेल्वेला ग्रीन सिग्नल देण्यासाठी आणि राज्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केंद्राकडून जी मदत होते. त्याचे उद्घाटन आणि भूमिपूजन लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मुंबई महाराष्ट्रात येत असतात. ही राज्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आजवर केंद्राचे भरपूर सहकार्य आणि वेळ आपल्याला मिळाला आहे. आताही राज्यातील प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मुंबईत येत असतील तर ती राज्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने ज्या काही गोष्टी केंद्राकडे मांडायचे आहेत, त्याची संधी राज्याला या दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात केंद्राकडून राज्याला जे अपेक्षित आहे, त्याची मांडणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधानांकडे करतील, असा विश्वास मंत्री देसाईंनी व्यक्त केला.
मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी :गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे गटात यामुळे नाराजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पापूर्वी विस्तार होईल का, अशा प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे लवकरच विस्तार होईल. कदाचित अधिवेशनाच्या पूर्वीसुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे मंत्री देसाईं म्हणाले.
हेही वाचा:Hasan Mushrif On Kirit Somaiya :... तर आमदारकीचा राजीनामा देणार - हसन मुश्रीफ