मुंबई PM Narendra Modi Maharashtra visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी(12 जानेवारी) नाशिक येथील 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्यानंतर राज्यातील 30 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचंही लोकार्पण करणार आलं. नाशिक दौऱ्यानंतर मोदींनी मुंबईतील 'अटल सेतू' या 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेल्या सागरी पुलाचंही उद्घाटन केलं आहे.
Live updates-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, " आज मी नाशिकमध्ये आहे, मी माझे सौभाग्य मानतो. या धरतीनं टिळक आणि सावरकरांना घडविलं. काळाराम मंदिरात सफाई करण्याचं भाग्य मिळालं, हे माझं सौभाग्य आहे. राजमाता जिजाऊंना कोटी कोटी प्रणाम आहे."
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "नव्या भारताची प्रतिमा बदलत आपण जगात 10व्या स्थानावरून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. 3 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा, भारत तीन वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल."
- मोदी लक्षद्वीपला गेले आणि मालदीवमध्ये भूकंप झाला. जगभरात मोदींचा गौरव होत आहे. मोदी है तो मुमकीन है, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले आहे. त्यानंतर टाळ वाजवित भजन केलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा असल्यानं अहमदनगरमध्ये आंदोलकांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनात्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं आहे. कांदा निर्यात बंदी उठविण्याची नवले यांनी मागणी केली होती. आंदोलक नाशिकच्या दिशेने जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रात्री १२ पासून अनेक आंदोलकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
- पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या रोडमध्ये नाशिककरांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताकरिता भाजपाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनीदेखील गर्दी केली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 10 वाजता नाशिकच्या निलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होईल.
- मिरची चौक ते रामकुंड रोड शो येथं सकाळी 10:15 वाजता होणार आहे.
- रामकुंड येथे गोदावरी नदीचं सकाळी 11:15 वाजता पूजन होईल.
- श्री काळाराम मंदिर येथे सकाळी 11: 30 वाजता पूजन आरती होईल.
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते तपोवन मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचं 12 वाजून 15 मिनिटांनी उद्घाटन होईल.
- पंतप्रधान मोदींचे दुपारी 2 वाजता 2.00 निलगिरी बाग हेलिपॅडकडे प्रस्थान तेथून मुंबईला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम होणार असलेल्या तपोवन मैदानाची पाहणी केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या माहितीनुसार युवा महोत्सावाला एक लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री ठाकूर गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, " स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात आहे. युवकांचा महाकुंभ होणार असून पंतप्रधान मोदी हे युवकांना संदेश देणार आहेत. या कार्यक्रमात 750 हून अधिक जिल्ह्यातील युवक सहभागी होणार आहेत. आम्हाला प्रभू रामाचा आशीर्वाद मिळवायचा होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची कार्यक्रमासाठी निवड केली."