मुंबईArvind Sawant Taunt:आम्ही वारंवार सांगत आहे, देशाच्या संविधानावर हल्ला होत आहे. देशाच्या घटनेवरच हल्ला करणारे लोक प्रोटोकॉल काय सांभाळणार? राज शिष्टाचार काय असतो? मी आणि राजन विचारे यांना बोलवायला पाहिजे होतं, निमंत्रण पत्रिकेत नाव टाकायला पाहिजे होतं. (MP Arvind Sawant) मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ट्रान्स हार्बर लाइनवर चालत गेलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही चालत गेलेले होते. पाठपुरावा देखील केला होता. राजन विचारे यांनीसुद्धा दिघा स्टेशन व्हावं यासाठी काम केल. त्यांचंसुद्धा नाव नाही. आज उद्घाटन होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. हे निमंत्रम अर्धा पाऊण तास पूर्वी मिळालं आहे. आम्ही गेलो असतो तर त्यांना ते खुपलं असत. सर्व मिंदेना निमंत्रण मात्र खंद्यांना नाही असं म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. न्याय दिला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ही तर प्रोटोकॉल तोडण्याची कामं:लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत मिंध्यांच्या गुलामांची नावं असल्याचं म्हणत अरविंद सावंत यांनी बारणे यांना टोला लावला आहे. आता तटकरे, बारणे हे त्यांच्या सोबत आहेत त्यांना निमंत्रण येणार, त्यांचं नाव असणार. गुलामांचं राज्य, लाचारांचं राज्य आहे. हा प्रकल्पही माझ्या मतदार संघात आहे. तसाच कोस्टल रोडसुद्धा माझ्या मतदार संघात येतो. निमंत्रण येणार की नाही माहीत नाही. गल्लीतल्या रेल्वे स्थानकांचंसुद्धा उद्घाटन आता पंतप्रधान करत असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खूप काम आहे. त्यांचंसुद्धा याच्यात नाव नाही. प्रोटोकॉल तोडण्याची कामं ते करतात.