महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रोहित वेमुलाप्रमाणेच डॉ. पायल तडवीचे प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र' - dr payal tadvi

रोहित वेमुलाप्रमाणेच डॉ. पायलचे प्रकरणही दडपण्यात येऊ शकते. कारण या गुन्ह्यामध्येही 'ती' आदिवासी होती, की नाही यावर चर्चा होताना दिसत आहे. मात्र, आम्ही हे षडयंत्र उधळून लावू. तसेच डॉ. पायलला न्याय मिळत नाही, तोपर्यत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमचे आंदोलन करू, असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी दिला आहे.

आंदोलक

By

Published : Jun 2, 2019, 11:04 AM IST

मुंबई - रोहित वेमुलाप्रमाणेच डॉ. पायलचे प्रकरणही दडपण्यात येऊ शकते. कारण या गुन्ह्यामध्येही 'ती' आदिवासी होती, की नाही यावर चर्चा होताना दिसत आहे. मात्र, आम्ही हे षडयंत्र उधळून लावू. तसेच डॉ. पायलला न्याय मिळत नाही, तोपर्यत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमचे आंदोलन करू, असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी दिला आहे.

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड प्रतिक्रिया देताना...

रोहित वेमुलाने 2016 साली आत्महत्या केली. त्यावेळी ती 'हत्या' आहे, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, रोहितच्या जातीचा मुद्दा पुढे करत ते प्रकरण दडपण्यात आले. आज या घटनेला 3 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. अनेक आंदोलने झाली पण रोहितच्या आईला अजूनही न्याय मिळालेला नाही.

डॉ.पायल तडवीला तिचे वरिष्ठ सहकारी डॉ. अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा आणि भक्ती मेहरे या तिघींनी मागील 2 वर्षांपासून जातीयद्वेषातून वारंवार अपमानित करत मानसिक त्रास दिला. यामुळे कंटाळून डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राभर उमटले. या घटनेचा तीव्र निषेध म्हणून राष्ट्रीय अदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय अदिवासी विद्यार्थी संघ, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन आणि भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ या संघटनांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.


वरिष्ठ सहकारी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार नायर हॉस्पिटलमधील वरिष्ठांकडे डॉ. पायलने हिने केली होती. पण त्या विरोधात त्यांना कोणतीही समज देण्यात आला नाही. उलट या तीनही डॉक्टरांनी रॅगिंग करणे चालूच ठेवले. तेव्हा मृत पायलने तिचे पती आणि आई यांना याची माहिती दिली. यावर तिच्या आई यांनी संबंधित हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर आणि आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य व अन्य शासन प्रशासन यांना पत्र व्यवहार करून आपल्या मुलीच्या होत असलेल्या मानसिक आणि जातीयवादी छळाबद्दल लेखी तक्रार केली होती. मात्र यावरही काही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे पायलने आत्महत्येचा मार्ग स्विकारला.


डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केल्यानंतर देशभरात चर्चा सुरू झाली. तेव्हा तडवी हिच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. सद्या राज्यात डॉ. पायल तडवीला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने करण्यात येत आहेत.


या आहेत मागण्या -

  • डॉ. पायल तडवी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ निकाल लावावे.
  • पुन्हा पोस्ट मार्टम (शवविच्छेदन) करण्यात यावे.
  • गुन्हेगार असलेल्या तिनही महिला डॉक्टरंची नार्को टेस्ट करण्यात यावी.
  • अॅट्रोसिटी अंतर्गत तत्काळ गुन्हे नोंदवून कार्यवाही करावी.
  • तीनही डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा.
  • आरोंपीना त्वरित नोकरीतुन बडतर्फ करावे.
  • तीनही डॉक्टरांची वैद्यकीय (MBBS) पदवी रद्द करावी.
  • संबंधित नायर हॉस्पिटलच्या प्रशासन व्यवस्थेवर कार्यवाही करावी.
  • डॉ. पायल यांच्या परिवारास नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपयाची मदत करण्यात यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details