महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कचराकुंडीतील भाजीपाला विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार - कचराकुंडीतील भाजीपाला विकला

नागरिक वाढता धोका लक्षात घेता भाजीपाला खरेदी करतानाही खबरदारी म्हणून मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, रोज वापरात येणाऱ्या वस्तूंचे सॅनिटायझर करणे या सर्व बाबी काटेकोरपणे पाळत आहेत. मात्र, बुधवारी दुपारी शिवडी पूर्व येथील कोळीवाड्यात एका भाजी विक्रेत्याने कचराकुंडीत फेकलेल्या भाजीची गोणी उचलून ती सडलेली भाजी हातगाडीवरून विभागातील नागरिकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

selling vegetables from garbage  vegetables from garbage in Mumbai  mumbai latest news  मुंबई लेटेस्ट न्युज  कचराकुंडीतील भाजीपाला विकला  मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत कचराकुंडीतील भाजीपाला विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार

By

Published : May 7, 2020, 8:08 AM IST

Updated : May 7, 2020, 12:22 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, अशातच शिवडी पूर्व येथे एका हातगाडीवर कचराकुंडीत फेकलेला भाजीपाला आणि द्राक्षे विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला. एका सतर्क नागरिकामुळे ही सर्व घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधित विक्रेत्याने तो भाजीपाला कचराकुंडीत फेकून दिला.

मुंबईत कचराकुंडीतील भाजीपाला विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार

मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्याचे पाहून मुंबईकर चिंतेत आहेत. यातच नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम कडक पाळा, असे पालिका सांगत आहे. नागरिक वाढता धोका लक्षात घेता भाजीपाला खरेदी करतानाही खबरदारी म्हणून मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, रोज वापरात येणाऱ्या वस्तूंचे सॅनिटायझर करणे या सर्व बाबी काटेकोरपणे पाळत आहेत. मात्र, बुधवारी दुपारी शिवडी पूर्व येथील कोळीवाड्यात एका भाजी विक्रेत्याने कचराकुंडीत फेकलेल्या भाजीची गोणी उचलून ती सडलेली भाजी हातगाडीवरून विभागातील नागरिकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याची माहिती व व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी काढून तो समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. ही माहिती स्थानिक नागरिक रुपेश ढेरंगे यांना मिळताच त्यांनी या भाजी विक्रेत्याला चांगलीच समज देत ती भाजी कुठून आणली? तसेच सडलेले का विकतो? अशी विचारणा केली. त्यानंतर भाजी फेकून देण्यास सांगताच संबंधित विक्रेत्याने जवळील कचराकुंडीत सर्व भाजी फेकली. यावेळी त्याने तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते.

Last Updated : May 7, 2020, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details