मुंबई- राज्य सरकारने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आली होती. दुकानदारांवर कारवाई करून दंडही वसूल करण्यात आला. बंदी लागू होऊन एक वर्षाचा कालावधी उलटले. तरीही आज प्लास्टिक सर्रास उपलब्ध होत असल्याने खरोखरच प्लास्टिक बंदी झाली आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने ही बंदी १०० टक्के लागू करणे शक्य होणार आहे.
प्लास्टिक हे सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले होते. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून त्या कचऱ्यात टाकल्याने प्रदूषणात वाढ होत होती. मुंबईत दररोज ९ हजार ५०० टन कचरा जमा होत होता. पालिकेने गेल्या २ वर्षांत या कचऱ्याचे प्रमाण ७ हजार टन पर्यंत कमी केले आहे. यात १४ टक्के सुका कचरा असतो. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्या ६ टक्के इतका असतो. राज्य सरकारने वर्ष भरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली.
हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...
मुंबईत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. गेल्या वर्षभराच्या काळात पालिकेने १२ लाखांहून अधिक दुकानांवर कारवाई करत ७५ हजार टन प्लास्टिक जप्त केले. त्यातून ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून दंड न भरणाऱ्या ५९९ दुकानदारांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मॉल, दुकानामधून प्लास्टिक विक्री बंद झाली आहे. मात्र, शेजारील राज्यांमधून सर्रास प्लास्टिक पिशव्या फेरीवाल्यांना मिळत असल्याने आजही प्लास्टिक बंदीची अंमलबाजवणी १०० टक्के करता आलेली नाही.
हेही वाचा - किर्तीकर म्हणातात 'आरे ' जंगल नाही, मग आदित्य ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध का?- शर्मिला ठाकरे
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे परराज्यातून येणारे प्लास्टिकही बंद होणार असल्याने बंदीची १०० टक्के अंमलबजावणी करणे शक्य आहे.
मुंबईत ४०८ टन प्लास्टिकचा कचरा