महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 'प्लाझ्मा' थेरपी यशस्वी; नायर रुग्णालयातील 15 रुग्णांची कोरोनावर मात - mumbai plasma therapy success corona

महापालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दात्यांकडून मिळालेल्या अँटीबॉडीजमुळे ४ रुग्ण बरे झाले होते. आता आणखी ११ रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे नायर रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय पालिकेच्या सायन, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

plasma therapy success in mumbai
मुंबईत 'प्लाझ्मा' थेरपी यशस्वी

By

Published : Jun 27, 2020, 5:36 AM IST

मुंबई - देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर एकीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातून 15 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. तसेच प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यामुळे केईएम, सायन, जेजे रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेले ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात दात्यांकडून मिळालेल्या अँटीबॉडीजमुळे ४ रुग्ण बरे झाले होते. आता आणखी ११ रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे नायर रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय पालिकेच्या सायन, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

हेही वाचा -कोरोना अपडेट : शुक्रवारी सर्वाधिक ५०२४ नव्या रुग्णांची नोंद, १७५ जणांचा मृत्यू

दरम्यान, प्लाझ्मा थेरपीला यश येत असल्यामुळे आणखी दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्यात येत आहेत. महापालिकेच्या सायन रुग्णालयात सहा दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्यात आल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि महापालिकेच्या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

काय आहे प्लाझ्मा थेरपी?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होते. यामुळे मध्यम आणि गंभीर लक्षणे असणारे रुग्ण कोरोनामधून बरे झाल्यावर त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) रक्तामधून काढली जातात. ही अँटीबॉडीज कोरोनाची लागण झालेल्या आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात. याला प्लाझ्मा थेरपी असे बोलले जाते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाइन्सनुसार ही प्रक्रिया पार पडते.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी नवीन 1 हजार 297 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 117 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 हजार 287 वर पोहचला आहे, तर मृतांची संख्या 4 हजार 177 झाली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४१ दिवसांवर पोहचला आहे. तर आठवड्याचा कोरोना वाढीचा दर १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आहे.

३ लाख वयोवृद्धांच्या चाचण्या -

मुंबईत २४ जूनपर्यंत ३ लाख ४ हजार ६९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर २५ लाख ७८ हजार ६२३ घरांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली आहे. तर ४ लाख ३६ हजारांवर ज्येष्ठ नागरिकांचीही तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन पातळी कमी आढळलेल्या २ हजार १३० जणांना उपचारासाठी रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details