मुंबई- येथील पवई तलावाच्या शेजारील पंचकुटीर येथे मेट्रो सहाच्या कामाचे खोदकाम सुरु आहे. दरम्यान आज दुपारी पवई तलावाकडून पवई परिसरात येणारी अठरा इंची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे पाण्याची मोठी नासाडी झाली असून, परिसरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. पाणी वाहून रस्त्यांवर आल्याने संपूर्ण परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गांधीनगरकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पवईत पंचकुटीर परिसरात पाईपलाईन फुटली; पाण्याची नासाडी - अठरा इंची पाइपलाइन फुटली
पाईपलाईन फुटल्यामुळे पवई परिसरातील फुलेनगर, चैतन्यनगर ,रमाबाईनगर, इंदिरानगर, स्वामीनारायण नगर ,पवई गावठाण, हीरानंदनी परिसरामध्ये आज दुपारपासून पाण्याचा तुटवडा पाहायला मिळाला आहे.

हेही वाचा-शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, सर्व जागांवर लढण्याची तयारी -उद्धव ठाकरे
पाईपलाईन फुटल्यामुळे पवई परिसरातील फुलेनगर, चैतन्यनगर ,रमाबाईनगर, इंदिरानगर, स्वामीनारायण नगर ,पवई गावठाण, हीरानंदनी परिसरामध्ये आज दुपारपासून पाण्याचा तुटवडा पाहायला मिळाला आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जाते. हे पाणी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर आले होते. यामुळे पवई तलावाकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या वाहनाची गती मंदावली. पालिकेच्या भांडुप एस विभागाच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काही भागात रात्री उशिरा गढूळ पाणी येण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.