मुंबई -पूर्व उपनगरातील चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईप लाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर पाणीच-पाणी झाले. यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पिण्याचे पाणी पुरवठा करणारी ही पाईप लाईन पालिकेची आहे.
चेंबूर-वाशी नाका परिसरात पाईप लाईनचा व्हॉल्व बदलताना लाखो लिटर पाणी वाया - mumbai municipality
वाशी नाका परिसरात पाईप लाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
![चेंबूर-वाशी नाका परिसरात पाईप लाईनचा व्हॉल्व बदलताना लाखो लिटर पाणी वाया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3926374-thumbnail-3x2-pipeline.jpg)
लाखो लिटर पाणी वाया जात आहे
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग काही वेळ मंदावला होता. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पालिकेच्या जल विभागाकडून पाईप लाइनचा व्हॉल्व बदलण्यात आला त्यामुळे ते पाणी सोडले होते, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले आहे.
लाखो लिटर पाणी वाया जात आहे