मुंबई- मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील थिएटर्स, स्विमिंग पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चवडमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच खासगी कंपन्यांनी घरूनच काम करण्याला प्राधान्य द्यावे. साथीच्या आजाराचे कलम २ राज्यभर लागू करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज विधानसभेत बोलत होते.
कोरोना : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद, खबरदारीसाठी राज्य सरकारचा निर्णय - corona positive maharashtra
मोठे कार्यक्रम आयोजित करू नये. तशी परवानगी देण्यात येवू नये. दिली तर ती मागे घ्यावी. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू राहतील. अजून संकट आलेले नाही. योग्य खबरदारी घेतल्यास हे संकट टळू शकेल. तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम आयोजित करू नये. तशी परवानगी देण्यात येवू नये. दिली तर ती मागे घ्यावी. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू राहतील. अजून संकट आलेले नाही. योग्य खबरदारी घेतल्यास हे संकट टळू शकेल. तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच काही संस्था आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.