मुंबई- काल एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर आपघात झाला. या अपघातात 17 जाणांचा मृत्यू झाला असून विमानाचे मुख्य वैमानिक दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. मराठमोळे असलेले साठे हे कुशल वैमानिक होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दीपक वसंत साठे हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करत होते. १९८१ साली ते हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे 'एअरबस ३१०' हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोईंग विमानावर स्थलांतरित झाले होते. केरळमधील अपघात हा बोईंग ७३७ विमानाचाच होता.