महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीएसएमटी पूल अपघात: मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल - सुजय कांटावाला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय या पादचारी पुलाचा भाग कोसळून अपघात झाला होता. या प्रकरणी ज्येष्ठ वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Mar 30, 2019, 6:21 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय या पादचारी पुलाचा भाग कोसळून अपघात झाला होता. या प्रकरणी ज्येष्ठ वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

डीडी इंजिनिअरिंगने मुंबई महानगर पालिकेला सीएसएमटी येथील पूल धोकादायक नसल्याचा अहवाल दिला होता. तरीदेखील हा पूल कोसळला. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी वरिष्ठ वकील सुजय कांटावाला यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. येत्या २ एप्रिलला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पूल

मुंबईतील टाईम्स ऑफ इंडिया इमारत आणि सीएसटी स्टेशनला जोडणारा हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कोसळला. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण गंभीर जखमी झाले होते. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन सुरुवातीला या घटनेची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. मात्र, नंतर पालिकेने या पुलाच्या मेंटेनन्सची जबाबदारी स्वीकारली. तसेच डीडी इंजिनिअरिंग या कंपनीद्वारे या पुलाचे ऑडिट केले होते. त्यांनी हा पूल पूर्णतः बरा असून छोट्या-मोठ्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, असे सांगितले. त्यामुळे आज या पूल दुर्घटनेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details