महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फिजिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स विषयाची पुनर्परीक्षा १४ जानेवारी रोजी

ज्या विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर रोजी परीक्षा दिलेली असेल तरी ते विद्यार्थी १४ जानेवारी रोजी परीक्षा देतील. या दोन्ही परीक्षेमधील ज्या परीक्षेत गुण जास्त असतील ते गुण ग्राह्य धरण्यात येतील, असाही निर्णय या बैठकीत करण्यात आला.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

By

Published : Dec 31, 2019, 7:56 AM IST

मुंबई - येथील मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एमएससी फिजिक्स सत्र 3 मधील स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयाची परीक्षा १३ डिसेंबर २०१९ रोजी घेतली होती. या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १४ जानेवारी २०२० रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परिपत्रक

हेही वाचा-वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची २६ डिसेंबर २०१९ रोजी बैठक झाली. यात एमएससी फिजिक्सच्या सत्र 3 मधील स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयासाठी परीक्षेत बसलेल्या नव्या व जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा १४ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या त्याच परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.

जास्त गुण ग्राह्य धरले जातील

ज्या विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर रोजी परीक्षा दिलेली असेल तसेच ते विद्यार्थी १४ जानेवारी रोजी परीक्षा देतील. या दोन्ही परीक्षेमधील ज्या परीक्षेत गुण जास्त असतील ते गुण ग्राह्य धरण्यात येतील, असाही निर्णय या बैठकीत करण्यात आला. अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले आहे. तसेच विज्ञान विद्याशाखेतील या परीक्षेशी संबंधित महाविद्यालयांनाही पाठविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details