इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे माहिती देताना मुंबई :राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या (Corona virus Update Maharashtra ) वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सुसज्ज नव्हती. याचे प्रत्यंतर सर्वांना आले आणि हीच परिस्थिती देशभर होती. जेव्हा जनतेला ऑक्सिजन सिलेंडर मिळायला हवे ते मिळत नव्हते व्हेंटिलेटर गरजेचा होता पण तो मिळत नव्हता. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले तर काहींचे मृत्यू झाले. आता राज्यात या घडीला जर पुन्हा महामारी आली आणि तिचे संकट उभे राहिले तर आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीच प्रत्येक राज्यात मॉक ड्रील करण्यात यावे, याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यात काही विभागामध्ये मॉक ड्रील ( Mock drills in Maharastra ) करण्यात आले.
मोकड्रिलचा आढावा : राज्यात 1308 शासकीय आणि खाजगी वैद्यकीय संस्थानी मॉकटेल परिपूर्ण रीतीने 608 सरकारी 628 खाजगी रुग्णालयात मॉक ड्रील ( Mock drills conducted in 1308 medical institutions ) केले गेले. तसेच 28 सरकारी आणि 20 खाजगी महाविद्यालयात देखील यशस्वीपणे मॉक ड्रिल ( Mock drills ) केले गेले.
राज्यातील आंतरराष्ट्रीय प्रवासी सर्वेक्षण :मॉक ड्रील अंतर्गत एकूण 44666 प्रवासी दाखल झाले. त्यापैकी 703 व्यक्तींचे आरटीपीसीआर चाचण्या केल्या तरच 2 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळात पाठवले गेले. राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णांमध्ये नवीन काटा प्राणवायू व्यवस्था ही अद्ययावत असल्याचे आढळून आले. गतिमान मॉडल उपक्रमामध्ये जिल्हा आणि तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी यामध्ये समन्वय आणि संयोजन केले.
आधीच्या तुलनेने स्थिती बरी : महाराष्ट्राच्या 35 जिल्हा मिळून सहा महसुली विभागामध्ये आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने आणि इतर विभागांच्या सहकार्याने सार्वजनिक रुग्णालय दवाखाने या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. " राज्यांमध्ये सहाही महसूल विभागांमध्ये ऑक्सिजन प्लांटची स्थिती सध्या चांगली आहे. म्हणजे उद्या कोरोना महामारी पसरले आणि नवीन विषाणूचे रुग्ण जर वाढले तर त्यासाठी पुरेसा ऑक्सिजन प्लांट आहे. असे देखील डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितले."
सुसज्ज बेडची स्थितीचा अभाव : डॉ. अभय शुक्ला यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विश्लेषण मांडले. त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे, राज्यामध्ये आज घडीला 22 हजार ते 23 हजार सुसज्ज बेड आहेत याचा अर्थ असा की संपूर्ण आयसीयू आणि अद्ययावत यंत्रणा आणि व्हेंटिलेटर सह बेड उपलब्ध असणे म्हणजे सुसज्ज बेड असे म्हणता येते. याबाबत फारशी समाधानकारक स्थिती राज्यांमध्ये आज घडीला नाही मात्र शासनाने आधीच्या कोरोना महामारीच्या अनुभवानंतर अनेक सार्वजनिक आणि खाजगी दवाखान्यांमध्ये सुसज्ज बेड असण्याचे कार्य हाती घेतलेले आहे .त्यामुळे मागच्या वेळेला जशी हाल झाले तसे या वेळेला होणार नाही याची दक्षता राज्याचं आरोग्य विभाग घेत आहे. परंतु इतर राज्यांच्या तुलनेमध्ये तामिळनाडूमध्ये 72 हजार बेड उपलब्ध आहे दिल्लीमध्ये देखील आपल्या राज्यापेक्षा जास्त सुसज्ज बेड उपलब्ध आहेत.
जे जे रुग्णालयाची स्थिती : कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण तपासणी साठी रुग्णालयात आल्यानंतर प्राथमिक उपचारापासून अंतिम टप्प्यापर्यंत कशा पद्धतीने त्या रुग्णाची सेवा केली पाहिजे, कशा पद्धतीने त्याच्यावर प्राथमिक उपचार करायला पाहिजेत, या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला. सध्या जे जे रुग्णालयामध्ये १३५२ बेड हे करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आयसोलेशन बेड, आयसीयु बेड, ऑक्सीजन पुरवठा, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधांची व्यवस्था करणे फार गरजेचे असल्याने त्या पद्धतीने सुद्धा आढावा घेण्यात आला.
ऑक्सिजन प्लांट वाढवण्यासाठी निर्णय : राज्याचे विदर्भ, मराठवाडा, खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी 25 मेट्रिक टन ते पाचशे मीटर एवढे ऑक्सिजन उपलब्ध होईल असे ऑक्सिजन प्लांट आहेत. मुंबई, पुणे, व नागपूर या शहरांसाठी त्यापेक्षा अधिक मॅट्रिक टनाची सोय व्हावी याबाबत शासनाने तशी तयारी केलेली आहे. मोठी महानगर या ठिकाणी पाचशे मीटर आणि त्याच्या पुढे इतका साठा असलेले ऑक्सिजन प्लांट शासनाने मे 2021 च्या शासन निर्णयानुसारच तयार करण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार आज राज्यामध्ये पुरेशी व्यवस्था आहे.
कोरोना रूग्ण स्थिती : कोविड महामारीच्या संदर्भात राज्यातील डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की ,"कालपर्यंत कोविडचे पंधरा रुग्ण आढळलेले होते आज 26 रुग्ण आढळले. मात्र 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले. विलगीकरणानंतर आणि औषध उपचारानंतर हे रुग्ण बरे होतात ;असा अनुभव आहे जनतेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले पाहिजे .राज्यामध्ये दोन वर्षपूर्वी पेक्षा ऑक्सिजन प्लांट आणि सिलेंडर आणि प्राणवायू याबाबतची स्थिती सुधारलेली आहे." माय गव्हर्नमेंट ह्या एपवर नमूद आहे की, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 227 रुग्ण आढळले. या आकडेवारीसह देशातील एकूण रुग्णसंख्या 3 हजार 424 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. तसंच, गेल्या 24 तासांत 186 लोक कोरोनावर मात करून बरे झाले.राज्यात काल केवळ 15 रुग्ण आढळले .मात्र गंभीरपणे परिस्थिती नाही, अशी माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
खबरदारी घेणे महत्वाचे : यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सतर्कतेचा इशारा देत महत्त्वाची माहिती ईटीवी भारत सोबत बातचीत करताना मांडलेली आहे. राज्यातील आणि देशातील निवडक डॉक्टरांच्या सोबत आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीतून आज अद्ययावत जी काय माहिती समोर आली आहे. त्यानुसार चीनमध्ये रुग्णसंख्या खूप आहे. कारण त्या ठिकाणी 60 पेक्षा कमी वयाच्या लसीकरण त्याशिवाय चीनमधील लस ही परिणामकारक नव्हती. त्यामुळे देखील तिथे रुग्णसंख्या वाढली आहे. चीनमधील महामारीची माहिती सत्य असल्याची खात्री भारत सरकारने केली आहे. मात्र भारतात राज्यात सर्व नागरिकांनी सतर्क राहणे मास्क सक्तीने वापरणे गरजेचे आहे. कारण चीन मधून बातम्यांचे व्हिडिओ जे येत आहेत ते खरे असल्याचे भारत सरकारच्या पडताळणी मधून समजून आलेले आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहणे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, नियमित केले पाहिजे.