महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायन रुग्णालयात बिल कमी करण्याचे आमिष, रुग्णाच्या बहिणीवर जिन्यावरच बलात्कार - सायन

पीडित महिला गरीब कुटुंबातील असून ती तिच्या लहान बहिणीला घेऊन उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच आली होती. रुग्णालयाच्या आवारात फिरणार्‍या धारावीतील ३१ वर्षीय व्यक्तीने पीडित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ११ मे (शनिवारी)  उघडकीस आली होती.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 14, 2019, 5:54 PM IST

Updated : May 14, 2019, 7:43 PM IST

मुंबई- सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या बहिणीवर पाचव्या मजल्यावरील जिन्यावरच लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना ११ मे (शनिवारी) उघडकीस आली. या प्रकरणी सायन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून धारावीत राहणार्‍या ३१ वर्षीय दीपक अण्णापा कुंचिकुर्व्हे या व्यक्तीला अटक केली. या घटनेमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणार्‍या रुग्णांच्या महिला नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमान्य टिळक रुग्णालय सायन

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही ३७ वर्षांची असून ती पुण्याजवळील एका खेड्यात राहणारी आहे. गरीब कुटुंबातील ही पीडित महिला तिच्या लहान बहिणीला घेऊन उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच आली होती. पीडित महिलेच्या बहिणीला मुत्राशयाचा त्रास असल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते.

रुग्णालयाच्या आवारात फिरणार्‍या धारावीतील ३१ वर्षीय व्यक्तीने पीडित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला मदत करण्याच्या नावाखाली तिच्यासोबत ओळख वाढवली. येथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसोबत आपली ओळख असून बहिणीवर चांगला उपचार करून देऊ व बिल कमी करू असे सांगितले. ११ मे शुक्रवारी भरदुपारी या व्यक्तिने या पीडित महिलेला रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील जिन्याजवळ रिकाम्या जागेत आणले व तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरुद्ध भा.द.वि प्रमाणे कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या व्यक्तिला रविवारी धारावी येथून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सायन पोलिसांकडून केला जात आहे.

Last Updated : May 14, 2019, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details