मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशासह राज्यात शनिवारनंतर रविवारीही इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालेली पाहायाला मिळाले. देशभरातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्रातही पेट्रोलच्या दराने २ ते ३ रुपयांच्या फरकाने शंभरी गाठली आहे. तर काही जिल्ह्यात स्पीड पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे.
राज्यात आज परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर आहेत, परभणी जिल्ह्यात प्रति लिटरसाठी ग्राहकांना ९९.१ रुपये मोजावे लागत आहेत. त्या खालोखाल रत्नागिरी, जळगाव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
रविवारी राज्यात विविध जिल्ह्यातल्या पेट्रोलच्या किमती
परभणी :-
- पेट्रोल- 99.01
- डिझेल- 88.75
रत्नागिरी -
- पेट्रोल- 98.18
- डिझेल - 87.89
जळगाव
- पेट्रोल 98.04
- डिझेल 87.73
- स्पीड पेट्रोल 100.88