महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder in Dahisar : थाळी खात असताना वादाचे रुपांतर खूनात; मित्राकडून मित्राची हत्या - Crime In Mumbai

दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १०० रुपयांत एकत्र थाळी खाणाऱ्या मित्राने आपल्या मित्राची हत्या केली. ( Person Killed his Friend ) खुनानंतर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने स्वतः पुरावे जाळले. ( Accused Distroy Proof After friend murder )

Murder in Dahisar
दहिसरमध्ये मित्राकडून मित्राची हत्या

By

Published : Feb 7, 2022, 4:55 PM IST

Updated : Feb 9, 2022, 4:24 PM IST

मुंबई - दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १०० रुपयांत एकत्र थाळी खाणाऱ्या मित्राने आपल्या मित्राची हत्या केली. ( Person Killed his Friend ) खुनानंतर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने स्वतः पुरावे जाळले. ( Accused Distroy Proof After friend murder ) इतकेच नाही तर हत्येनंतर त्याने स्वतः पोलीस नियंत्रणाला फोन करून मित्राचा मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. राजू पाटील असे मृताचे नाव आहे. ते गॅरेजमध्ये काम करायचे.

याबाबत माहिती देताना डीसीपी सोमनाथ घार्गे (झोन-१२ मुंबई)

पोलिसांनी दिलेली माहिती -

मुंबई पोलीस झोन १२ चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारीला रात्री १२ वाजेच्या सुमारास दहिसर येथील एका गॅरेजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचा फोन पोलीस कंट्रोलमधून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बुडक्यात घेऊन तपास केला असता मृताचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला असता, पोलीस नियंत्रणाला फोन करणारा मृताचा मित्रच त्याचा मारेकरी असल्याचे समोर आले आहे. हत्येपूर्वी दोन्ही मित्रांनी एकत्र दारू प्यायली आणि त्यानंतर १००रुपयांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपींनी पाईपच्या सहाय्याने मृताचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. इतकेच नाही तर मारेकरी मित्रही पोलिसांसोबत राहून या प्रकरणात पोलिसांना मदत करत होता.

हेही वाचा -Shivendraraje Vs Udayanraje : हत्तीची काय गरज, तुम्ही उडी मारली तर मी चिरडून जाईन; शिवेंद्रराजेचा उदयनराजेंना टोला

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. परमेश्वर बाबुराव कोकाटे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय २८ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तो टेम्पोमालक आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत दोघेही एकमेकांना सुमारे ८ वर्षांपासून ओळखत होते. खूप चांगले मित्र होते आणि अनेकदा एकत्र बसून दारू प्यायचे, जेवणही करायचे. पण या दोघांची मैत्री १०० रुपयांसाठी अचानक खुनापर्यंत पोहोचली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Feb 9, 2022, 4:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details