मुंबई : दिवाळी सणाची आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र, या दिवाळी सणाला शिवाजी नगर परिसरात गालबोट (Murder Bursting Firecrackers) लागले असून अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नटवर पारेख कंपाउंड येथे मोकळ्या मैदानावर काचेच्या बॉटलमध्ये फटाके पेटवण्यास मज्जाव (dispute over bursting firecrackers in Mumbai) केल्याने झालेल्या भांडणात अल्पवयीन मुलासोबत २१ वर्षीय सुनील नायडू याने वाद घातला. या वादातून सुनील नायडू याची हत्या (person killed by minor boys) झाली. (murder during Lakshmi Puja Mumbai), (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
Murder Bursting Firecrackers : लक्ष्मीपूजनाच्या वेळेला फटाके फोडण्यावरून वाद, चाकूने सपासप वार करून हत्या - person killed by minor boys
मोकळ्या मैदानावर काचेच्या बॉटलमध्ये फटाके पेटवण्यास मज्जाव (dispute over bursting firecrackers in Mumbai) केल्याने झालेल्या भांडणात अल्पवयीन मुलासोबत २१ वर्षीय सुनील नायडू याने वाद घातला. या वादातून सुनील नायडू याची हत्या (person killed by minor boys) झाली. (murder during Lakshmi Puja Mumbai), (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
![Murder Bursting Firecrackers : लक्ष्मीपूजनाच्या वेळेला फटाके फोडण्यावरून वाद, चाकूने सपासप वार करून हत्या Murder Bursting Firecrackers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16735758-thumbnail-3x2-firea.jpg)
चाकूचे सपासप वार करून संपविले-शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास इमारत क्रमांक 15 बी नटवर पारेख कंपाउंड येथील मोकळ्या मैदानात विधी संघर्ष बालक (अल्पवयीन मुलगा) हा काचेच्या बाटलीत फटाके फोडत होता. यावरून त्यास सुनील शंकर नायडू (21) यांनी हटकले. त्यानंतर फटाके फोडणारा विधी संघर्ष बालक आणि त्याचा भाऊ यांनी त्याच्या मित्रासह सुनील नायडू यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी एका विधी संघर्ष बालकाने त्याच्याकडील चाकूने सुनील नायडू यांच्या मानेवर सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले.
२ विधी संघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात -त्यानंतर जखमी अवस्थेत नायडू यांना राजवाडी रुग्णालय येथे नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या हत्येच्या घटनेत २ विधी संघर्ष बालकांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी एका विधीसंघर्ष बालकाचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले.