मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलीस कोठडी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडे तपास आल्याने आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळविण्यासाठी गुन्हे शाखेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. परंतु या आरोपींची न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात चौकशी करण्याची गुन्हे शाखेला परवानगी देण्यात आली आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची तुरुंगातच होणार चौकशी - Suicide
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलीस कोठडी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आगरिपाडा पोलीस ठाण्याकडून राज्य सरकारने गुन्हे शाखेकडे सोपवला होता. दरम्यान, सत्र न्यायालयाकडून नायर रुग्णालयातील तिन्ही डॉक्टर आरोपींना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि 7 जून ते 9 जून पर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चौकशीसाठी आरोपींचा ताबा तुरुंगातच मिळणार आहे. येत्या सोमवारी या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.