महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Andheri East By Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मागील 15 वर्षातील अल्प मतदान; मतदानाचा टक्का घसरला

Andheri East By Election: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षातील नाव आणि चिन्हाची लढाई, भाजपची उमेदवारी माघारी या नाट्यमुळे मुंबई सह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे मतदान आज संपले असून या मतदार संघात इतके टक्के मतदान झाले आहे.

Andheri East By Election
Andheri East By Election

By

Published : Nov 4, 2022, 8:20 PM IST

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षातील नाव आणि चिन्हाची लढाई, भाजपची उमेदवारी माघारी या नाट्यमुळे मुंबई सह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे मतदान आज संपले असून या मतदार संघात इतके टक्के मतदान झाले आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी शासनाकडून त्याचबरोबर उमेदवाराकडून प्रयत्न करूनही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे. मागील १५ वर्षातील सर्वात अल्प मतदान यंदा झाले असून एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले, तर २०१९ मध्ये ५३.४५ टक्के मतदान झाले होते. आता रविवारी ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१५ वर्षातील अल्प मतदान ?अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत झालेले ३१.७४ टक्के मतदान हे मागील १५ वर्षातील सर्वात कमी मतदान आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांना ६२६१५ इतकी मत मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आमदार मुरजी पटेल यांनी ४५ हजार ८०८ इतकी मत मिळविली होती. या मतदारसंघात एकूण २ लाख ८६ हजार २८२ इतके मतदार असून २०१९ साली झालेल्या निवडणुकांत ५३.४५ टक्के म्हणजेच १ लाख ५३ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

ही जागा युतीत शिवसेनेकडे२०१४ साली शिवसेना भाजप युती तुटल्यामुळे या जागेसाठी शिवसेना भाजप अशी लढत झाली होती. २०१४ साली झालेल्या लढतीत शिवसेना आमदार रमेश लटके यांनी ५२ हजार ८१७ मत मिळवीत विजय प्राप्त केला होता. तर भाजपचा केवळ ४ हजार ४७९ मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी सुनील यादव या भाजप उमेदवाराला ४८ हजार ३३८ इतकी मत मिळाली होती. मात्र त्यानंतर ही जागा युतीत शिवसेनेकडे होती. यापूर्वी २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना ५५,९९० मते भेटली होती. तर शिवसेनेचे सुरेश लटके यांना ५०,८५२ मते भेटली. तसेच मनसेचे संदीप दळवी यांना २५०५२ मते भेटली होती. २००९ मध्ये एकूण ४९ टक्के मतदान झाले होते.

२०१९ च्या निवडणुकीत सर्वात कमी मतदान कुलाबा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४०.२० टक्के इतके झाले होते. भाजपचे राहुल नार्वेकर यांना ५७३५० तर काँग्रेसचे भाई जगताप यांना ४११९१ मते भेटली होती. त्याखालोखाल उल्हासनगरमध्ये ४१.२० टक्के, कल्याण पश्चिममध्ये ४१.९३ टक्के, अंबरनाथमध्ये ४२.४३ टक्के, वर्सोवा ४२.६६ टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२.६८ टक्के मतदान झाले होते.

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीची आठवण ? २०१५ साली शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर कॉंग्रेसने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक सुरुवातीपासून चुरशीची झाली होती. मातोश्रीच्या अंगणात ही निवडणूक होत असल्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा तब्बल 19 हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हा वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत केवळ ३८ टक्के मतदान झाले होते.

अंतिम निकालतृप्ती सावंत (शिवसेना) – ५२७११, नारायण राणे (कॉंग्रेस)- ३३७०३, रेहबर खान (एमआयएम)– १५०५०

यंदाची मतदानाची टक्केवारी घसरण्याची ५ प्रमुख कारणेशिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व, विधानसभा जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली गेली होती. तर दुसरीकडे या निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी झाली होती. परंतु या दरम्यान काही नाट्यमय घडामोडी अशा घडल्या की, त्या कारणास्तव मतदारांच्या मनात सुद्धा सांशकता निर्माण झाली होती. आणि याच कारणासाठी मतदानाची टक्केवारी घसरली. जाणून घेऊया मतदानाची टक्केवारी घसरण्याची पाच प्रमुख कारणे-

१)ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत होत्या. त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामाही वादात सापडला. राजीनामा मंजूर व्हावा. यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. न्यायालयीन लढाईनंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. हे नाट्य ज्या पद्धतीने झाले ते मतदारांना रुजलेले नाही आहे, या कारणास्तव सुद्धा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

२) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी अचानक माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजगी बोलूनही दाखवली. या संपूर्ण मतदानावर एक तर्फे बहिष्कारच टाकला.

३)ऐन शेवटच्या क्षणी मुरजी पटेल यांना उमेदवारी देत भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. परंतु त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली होती. तसेच विनंती करताना राज्याच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील तशी विनंती केल्याने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. या सर्व गोष्टी मतदारांच्या नजरेपासून लपून राहिल्या नाहीत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता. संस्कृतीची आठवणच करून द्यायची होती, तर ती अगोदर का झाली नाही ? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांसह मतदारांच्या मनात संभ्रम करणारा निर्माण झाला असल्या कारणाने अनेक मतदारांनी सुद्धा या मतदानावर बहिष्कार टाकला.

४)राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे दोन गट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकर) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) असे दोन गट झाले आहेत. या कारणाने सुद्धा मुळ शिवसेना विभागली गेली आहे. अशातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच उद्धव ठाकरे गटाकडून ही पोटनिवडणूक लढवत असल्याने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या समर्थकांनी सुद्धा भाजप कार्यकर्त्यांसह या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. ऋतुजा लटके या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने यंदा धनुष्यबाण हे चिन्ह मतदान चिन्हाच्या यादीतून बाहेर पडले आहे. या कारणामुळे सुद्धा अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

५) या निवडणुकीत, नोटाचा वापर करण्यासाठी मतदारांना पैसे देऊ केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला होता. या प्रकरणावरून सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या गेल्या. एकंदरीत ज्या पद्धतीने हा निवडणूक प्रचार चर्चेत राहिला, त्या अनुषंगाने मतदार पण या सर्व प्रकाराला कंटाळले होते. या कारणास्तव सुद्धा अनेकांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details