मुंबई - शहरातील अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचले असून चाकरमान्यांचे हाल होत आहेत. बस, रेल्वे, लोकल ठप्प झाल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली असून पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली असून नालासोपारा-वसई रुळावर पाणी साचल्याने अनिश्चित काळासाठी लोकल सेवा बंद झाली आहे. शहरातील विविध भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणचे ड्रेनेज तुंबले असल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. त्यामुळे, हे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरले आहे.