मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईमध्ये सतर्कता बाळगली जात असली तरी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पोलिसांकडून आवाहन करूनसुद्धा मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर जमा होत आहेत. अनेक ठिकाणी सांगूनसुद्धा नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री असलम शेख यांनी रस्त्यावर नमाज किंवा पूजाअर्चा करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यावर नमाज, पूजाअर्चा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा , पालकमंत्री शेख यांचे आदेश - रस्त्यावर नमाज करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा
मुंबई पोलिसांकडून आवाहन करूनसुद्धा मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर जमा होत आहेत. अनेक ठिकाणी सांगूनसुद्धा नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री असलम शेख यांनी रस्त्यावर नमाज किंवा पूजाअर्चा करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यावर नमाज करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कलम 144 लागू आहे. संचारबंदी असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या 24 तासात मुंबई व उपनगर परिसरात कलम 188 च्या अंतर्गत 97 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याच्या संदर्भात दक्षिण मुंबईत 18 गुन्हे , मध्य मुंबई 4 , पूर्व मुंबई 16 , पश्चिम मुंबईत 1 तर उत्तर मुंबईत 19 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.