मुंबई - ज्या लोकांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विश्वास नाही, त्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारले पाहिजेत असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कारण, त्या लोकांना सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान माहित नसल्याचेही ठाकरे म्हणाले.
सावरकरांवर विश्वास नसणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारायला हवेत - उद्धव ठाकरे - स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
ज्या लोकांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विश्वास नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारले पाहिजेत असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
![सावरकरांवर विश्वास नसणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारायला हवेत - उद्धव ठाकरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4221027-thumbnail-3x2-uddd.jpg)
मातोश्री येथे पीक विम्यासंबंधी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना उद्धव यांनी यावर भाष्य केले. दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या सावरकरांच्या पुतळ्यास एनएसयूआय संघटनेने काळे फासल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर देशभरात सावकरप्रेमींनी रोष व्यक्त केला असून उद्धव ठाकरेंनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा आज समाचार घेतला. सावरकर यांच्यावर विश्वास नसणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारायला हवेत असे ठाकरे म्हणाले. यापूर्वीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला असल्याचे ते म्हणाले.