मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
'भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जनतेने विचार करावा' - कोरोना संकटात भाजप आंदोलन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताळण्यात महाविकासआघाडी सरकारला अपयश आल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी एक ट्विट करून जनतेला विचार करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताळण्यात महाविकासआघाडी सरकारला अपयश आल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी ट्विट करून जनतेला विचार करण्याचे आवाहन केले आहे.
"हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! असा विचारही जनतेने मनात आणावा" अशा आशयाचे ट्वीट करून जयंत पाटील यांनी भाजपच्या आंदोलनावर जनतेला सावध केले आहे.