महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनतेने तेच जोडे काँग्रेसला परत करावे - रणजित सावरकर - ncp

सावरकरांच्या पुतळ्याला जे जोड्यांचे हार घातले आहेत. तेच जोडे आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या उमेदवाराला परत करून काँग्रेसला धडा शिकवावा.

जनतेने तेच जोडे काँग्रेसला परत करावे - रणजित सावरकर

By

Published : Aug 23, 2019, 7:45 PM IST

मुंबई -दिल्ली विद्यापीठातील सावकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सावकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जनतेने तेच जोडे काँग्रेसला परत करावे - रणजित सावरकर

सरकारने याप्रकरणी कारवाई करावी, कायद्याने ते करणं बंधनकारक आहे. सावरकरांच्या पुतळ्याला जे जोड्यांचे हार घातले आहेत. तेच जोडे आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या उमेदवाराला परत करून काँग्रेसला धडा शिकवावा,असे आवाहन सावरकर यांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

दरम्यान, सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यापूर्वी राहुल गांधी यांनीही अशा प्रकारे टीका केली होती. या औलादींना स्वातंत्र्याचे महत्व कळणार नाही, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details