मुंबई - मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी सायंकाळी मरीन ड्राईव्ह येथे मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी - मरीन ड्राईव्ह
मुंबईकरांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
मरीन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर
मुंबईच्या सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी मरीन ड्राईव्ह पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याच मरीन ड्राइव्हला राणीच्या हाराची उपमाही दिली जाते. पहिल्याच पावसाळ्यात या राणीच्या हाराचे सौंदर्य बघण्यासारखे असते. पावसाळ्यात मोठमोठ्या लाटा सतत येत असतात आणि त्याचे फवारे अंगावर घेत पर्यटक पावसाचा आनंद लुटत असतात. बुधवारी सायंकाळीही असेच दृश्य मरीन ड्राईव्हवर बघायला मिळाले.