महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनता कर्फ्यू : मरिन ड्राईव्हच्या समुद्रकिनार्‍यावर शुकशुकाट - मरीन ड्राईव पोलीस ठाणे

पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज मुंबईच्या मरिन ड्राईव्ह किनारपट्टीवर कोणीही फिरताना दिसले नाही, अशी माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा प्रतिसाद
जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा प्रतिसाद

By

Published : Mar 22, 2020, 9:44 AM IST

मुंबई - मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि कायम गजबजलेल्या साडेतीन किमीच्या किनारपट्टीवर आज(रविवार) शुकशुकाट पसरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला मुंबईकरांनी येथेही दाद दिली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा प्रतिसाद

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसरात कोणताही नागरिक फिरू नये म्हणून वेळोवेळी गस्तही घालण्यात येत आहे. आज या साडेतीन किमीच्या किनारपट्टीवर लोकांनीच दाद दिली असल्याने याठिकाणी कोणीही फिरताना दिसत नाही. तरीही, आम्ही या परिसरात गस्त घालत असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली. लोकांनी आज आपली सामाजिक भूमिका बजावली असून त्यामुळे हा प्रतिसाद मिळत असल्याचेही कदम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details