महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात ३०० झाडांवर कुऱ्हाड.. पर्यावरणप्रेमींचा संताप

जवळपास तीनशे झाड कापण्यात आली आहेत. झाडे कापल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या पर्यावरण प्रेमींना मेट्रो कारशेड प्रकल्पात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यादरम्यान पर्यावरण प्रेमी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

मेट्रो कारशेड प्रकल्पातील झाडे कापल्यामुळे पर्यावरण प्रेमींचा संताप

By

Published : Oct 5, 2019, 9:40 AM IST

मुंबई - एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गोरेगाव मेट्रो कारशेड प्रकल्पातील झाडे कापल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या पर्यावरण प्रेमींना मेट्रो कारशेड प्रकल्पात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यादरम्यान पर्यावरण प्रेमी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

पोलिसांनी पर्यावरण प्रेमींना अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी महापालिका, मेट्रो प्रशासन, पोलीस हाय हायच्या घोषणा दिल्या. पोलीस पर्यावरण प्रेमी तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. झाडे तोडली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. दोषींवर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत मेट्रो कारशेडमधून बाहेर पडणार नसल्याचा निर्धार पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

हेही वाचा -आरेतील वृक्षतोडीला सुरुवात; नागरिकांची मोठ्या प्रमाणात निदर्शने

जवळपास ५० ते ६० तरुणांचे मेट्रो कारशेडमधील कापलेल्या झाडांजवळ आंदोलन सुरू आहे. गोरेगाव आरे मेट्रो कारशेड विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यानंतर मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करून राज्य शासनासह पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा कारशेडच्या आत असलेली झाडे मेट्रो प्रशासनाकडून तोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शेकडो पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तीनशे ते चारशे मुंबईकरांनी घटनास्थळी धाव घेत, झाडे कापण्याचे काम थांबवून मेट्रो प्रशासनाला जाब विचारला. मेट्रो प्रशासन चुकीच्या पद्धतीने झाडे कापत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी मोठी गर्दी केली.

हेही वाचा -आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. झाडे कापायला सुरुवात केल्यामुळे मेट्रो कारशेड येथे भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथून शेकडो पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात झाडावर चुकीच्या पद्धतीने तोडण्यात येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details