मुंबई - निसर्ग चक्रीवादळ रायगडमधील अलिबागजवळ मुरूड समुद्रकिनारी धडकले आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस सुरू झाला आहे. खबरदारी म्हणून, बोरिवली पश्चिमेकडील गणपत पाटील नगरातील नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळ : कांदळवन असलेल्या गणपत पाटील नगरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - निसर्ग चक्रीवादळ मुंबई
निसर्ग चक्रीवादळामुळे खबरदारी म्हणून बोरिवली पश्चिमेकडील गणपत पाटील नगरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे
निसर्ग चक्रीवादळ : कांदळवन असलेल्या गणपत पाटील नगरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने येथील रहिवाशांना शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, एमएचबी पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक कार्यकर्त्यांनी पेट्रोलिंग सुरू करत नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केले आहे.
Last Updated : Jun 3, 2020, 3:01 PM IST