मुंबई - लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्व उमेदवार प्रचारसभांसाठी जोर लावत आहेत. उमेदवारी अर्ज भरताना देखील शक्तीप्रदर्शन करण्याची संधी उमेदवार सोडत नाहीत. मुंबईत युतीच्या उमेदवारांनी असेच शक्तीप्रदर्शन आज केले. पण, या शक्तीप्रदर्शनावेळच्या वाद्यांच्या प्रचंड गोंगाटामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
मुंबईत उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात मतदारांचे हाल, वाहतूक खोळंबली - loksabha
यावेळी युतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र नेत मोठे शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी युतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र नेत मोठे शक्तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे सुद्धा युतीच्या उमेदवाराच्या शक्तीप्रदर्शनासाठी आले होते. यावेळी ढोल, ताशा, बेंजो स्पीकर आणि समर्थकांनी एकच कल्ला केला होता. हा आवाज इतका प्रचंड होता का रस्त्यावरील लोकांना लहान मुलांना याचा त्रास जाणवत होता.
लोकसभा उमेदवारी अर्ज भरून हे उमेदवार लोकांची सेवा करण्यासाठी जातात. परंतु अर्ज भरतानाच रॅली काढत लोकांना गोंगाट आणि ट्रॅफिकचा त्रास दिला. त्यामुळे हे उमेदवार पुढे काय करतील याचा नेम नाही, अशी भावना लोकांमधून व्यक्त होत होती.