महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या उमेदवारीला विरोध, स्थानिकांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप

भाजपने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे मीरा-भाईंदर येथील आमदार नरेंद्र मेहता यांना देखील उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिकांनी विरोध केला.

भाजप आमदार नरेंद्र मेहता

By

Published : Oct 2, 2019, 1:32 PM IST

मुंबई - भाजपने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामध्येच भाजपचे मीरा-भाईंदर येथील आमदार नरेंद्र मेहता यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. परंतू, तेथील स्थानिकांनी मेहतांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा प्रकरणी खुलासा करत उमेदवारीला विरोध केला आहे.


नरेंद्र मेहतांवर हे आहेत आरोप

१) अनधिकृत शाळा सुरु केली
२) बेकायदेशीर बांधकाम
३) नियमांमध्ये फेरबदल
४) नरेंद्र मेहता यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.
५) नियमबाह्य प्रकल्प
६) भूमिपुत्र जमीन घोटाळा

या प्रकारच्या घोटाळ्याचे आरोप मेहतांवर आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर येथील नागरिकांनी व माजी नगरसेवकांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. इतके नागरिक त्यांच्याविरोधात बोलत असताना त्यांना उमेदवारी कशी काय दिली जाते? असा सवालही लोकांनी पत्रकार परिषदेत केला. आरोप असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोपही माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला.

स्थानिक भावेश पाटील यांची स्वतःच्या मालकीची जमीन आमदार नरेंद्र मेहता यांनी दबाव टाकत हडप केली. त्याविरुद्ध त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवला आहे. त्याची केस चालू आहे. लोकांचा छळ करणाऱ्या माणसाला पक्ष उमेदवारी कसा देतो? असा सवालही भावेश पाटील यांनी केला. तसेच आणखी काही राहिवाशांची जमीन हडप करण्यासाठी नरेंद्र मेहता दबाव टाकत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. तक्रार करून देखील पोलीस आणि महानगर पालिकाचे अधिकारी काहीच कारवाई करत नाहीत. कारण त्यांना पोलीस, मुख्यमंत्री सर्वांचा पाठिंबा असल्याचा आरोप मीरा भाईंदरच्या जनतेने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details