मुंबई -जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आज शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्या न्याय व हक्कासाठी आझाद मैदानात 'युवा आंदोलन' करण्यात आले.शेतकरी, शेतमजूर महिला आणि बालकांच्या विविध समस्यांवरील प्रलंबित मागण्यांसाठी जनआंदोलनातर्फे शेतकरी कामगार महिलांनी एकत्रित येत आज लाक्षणिक आंदोलन केले. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने शेतकरी शेतमजूर आणि महिला बालकांच्या समस्यांबाबत आंदोलनकर्त्यांचे मत जाणून घेतले.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर महिला आणि बालकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सरकार यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. वेळोवेळी सरकारला मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला असताना देखील सरकार कोणत्याही प्रकारची दाद देत नाही. त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा ठेवत शेतकरी, शेतमजूर आणि महिला यांनी आज आझाद मैदान येथे आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे लाक्षणिक आंदोलन केले.