मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गांमधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांना हटवले आहेत.
कोरोनाचे महाराष्ट्रात 42 तर मुंबईत 15 रुग्ण आहे. मुंबईत एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून आयुक्तांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालया दरम्यान असलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.