महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation: मराठा आंदोलक होतायत आक्रमक; मुंबईत मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी शांततेत ठिय्या आंदोलन - peaceful Movement

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षण मागणीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पवईच्या वतीनं बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पवई येथील आयआयटी मेनगेट समोर आणि डिलाईल रोड येथील एनएम जोशी मार्ग म्युन्सिपल शाळेबाहेरील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी डिलाईल रोड आणि पवई परिसर ’एक मराठा लाख मराठा‘ तसंच ’आरक्षण आमच्या हक्काचे...‘ या घोषणांनी दणादणून निघाला.

Mumbai Maratha Reservation Protest
अनेक ठिकाणी शांततेत ठिय्या आंदोलन

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 10:39 PM IST

मुंबईMaratha Reservation: जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पवईतील पंचकुटीर, तिरंदाज व्हिलेज, गोखले नगर, हरिओम नगर, चैतन्य नगर, सायगलवाडी तसंच हिरानंदानी परिसरातील मराठा समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मराठा महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली. यावेळी आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केलं. यातील सुभाष लाड यांनी मराठा इतिहास उलगडून सांगत समाज एक असल्याचं सांगितलं.

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू : शांततेच्या मार्गाने जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेत सुरु असताना ते भरकटण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सरकारने मराठा आरक्षण जाहीर करावे, जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. तसेच जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आदेशाप्रमाणे आंदोलनाचे टप्पे सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी पवईत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. मुंबई जिल्ह्यात मराठा समाजाच्या अनेक बैठका सुरू झाल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईत पवईच्या मार्गाने थडकले आहे. यावेळी पालिका उपायुक्त दत्ता नलावडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आंदोलनाचे सहा टप्पे राहणार आहेत. त्यांचे जसे आदेश असतील त्याप्रमाणे आम्ही ही आंदोलन करणार आहोत. यातील एक भाग आजचा ठिय्या आंदोलन आहे. तीव्र आंदोलनासाठी देखील आम्ही तयार आहोत.- पंकज लाड, मराठा आंदोलक


सरकारला यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. आता महाराष्ट्रातील मराठे जागे व्हायला लागले आहेत. आरक्षणावर सरकारने निर्णय नाहीच घेतला तर काही तरी घडण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने यावर तोडगा त्वरीत काढावा. जरांगे-पाटील यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांना पाठींबा आहे. - अर्चना साळुंखे, महिला आंदोलक



मराठा बांधवांवर गेली कित्येक वर्षे अन्याय होत आहे. मुळात जाती आधारीत केलेले आरक्षणच मोठा अन्याय आहे. मात्र इतर जातींना जर आरक्षण देता त्याप्रमाणे मराठ्यांना देखील आरक्षण द्या. त्यांच्या मुलांना शिक्षण नोकरीत संधी मिळेल. त्यासाठी जरांगे-पाटील तीच मागणी करत आहेत. तसेच कुणबी-मराठा हा भेद जो सरकारने करुन ठेवला आहे. तो मिटवणे आवश्यक आहे. यामुळे जाती जातीत फार मोठी दरी निर्माण होत आहे. जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा ही प्रार्थना तसेच सरकारलाही आरक्षण मिळवून देण्याची बुद्धी व्हावी. -सुभाष लाड, ज्येष्ठ मराठा आंदोलक

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आंदोलनादरम्यान राज्यात 12 कोटींचं नुकसान - पोलीस महासंचालक
  2. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार, आजपासून पाणीही वर्ज
  3. All Party Meeting on Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणावरुन ठाकरे गटाचं आधी 'मानापमान' नंतर 'तळ्यात, मळ्यात', 'शेवटी सूर राहू दे'

ABOUT THE AUTHOR

...view details