मुंबई -आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९वी जयंती आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे बाबासाहेबांची जयंती शांततेत साजरी होत आहे. दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायी हजेरी लावून मानवंदना देत असतात. मात्र, यंदा लॉकडाऊन असल्यामुळे अनुयायांनी घरी बसूनच बाबासाहेबांना मानवंदना दिली.
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी दादरच्या चैत्यभूमीवर शुकशुकाट, कोरोनामुळे अनुयायांनी घरुनच दिली मानवंदना - Peaceful Celebration of Ambedkar Birth Anniversary due to COVID 19 Spread
दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सोशल डिस्टंस राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दादर परिसरातील राजगृह तसेच चैत्यभूमीवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी दादरच्या चैत्यभूमीवर शुकशुकाट, कोरोनामुळे अनुयायांनी घरुनच दिली मानवंदना