मुंबई- सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केल्याची घटना शहरातील नायर रुग्णालयात घडली होती. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील आरोपींनी मार्डला पत्र लिहून न्याय तपासणी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींकडून मार्डकडे न्याय तपासणीची मागणी - आरोपी
या पत्रात त्यांनी डॉ. पायल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. निवासी डॉक्टराला कामाचे ओझे असते, त्याला खरच तुम्ही रॅगिंग समजता का? असा उलट प्रश्न या तिन्ही मुलींनी मार्डला केला आहे.
![डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींकडून मार्डकडे न्याय तपासणीची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3395299-292-3395299-1558948953035.jpg)
नायर रुग्णालयातील डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. हेमा आहुजा यांच्या छळाला कंटाळून डॉ. पायल यांनी वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली, असा आरोप तिच्या पालकांनी केला होता. दरम्यान, आता या तिन्ही मुलींनी मार्डला पत्र लिहूल या प्रकरणाची योग्य तपासणी करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी डॉ. पायल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. निवासी डॉक्टराला कामाचे ओझे असते, त्याला खरच तुम्ही रॅगिंग समजता का? असा उलट प्रश्न या तिन्ही मुलींनी मार्डला केला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.