मुंबई -अभिनेत्री पायल घोषने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिक शोषणाचे आरोप लावले होते. या प्रकरणी अनुरागला चौकशीसाठी आज वर्सोवा पोलीस स्थानकात बोलवण्यात आले होते. लैंगिक शोषण आणि गैरवर्तन प्रकरणी संशयित अनुराग कश्यपची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. आज अनुरागची बाजू पोलिसांनी ऐकून घेतली आहे. पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पायल घोषने अनुरागवर आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला काल चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, आज अनुराग चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याच्यासोबत त्याची वकील प्रियांका खिमानीदेखील उपस्थित होती.