मुंबईत बुधवारी 49,833 लाभार्थ्यांचे लसीकरण - COVID-19 vaccination news
मुंबईत बुधवारी 49 हजार 833 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 33 लाख 74 हजार 261 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बुधवारी 49 हजार 833 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 33 लाख 74 हजार 261 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत बुधवारी 49 हजार 833 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 47 हजार 628 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 205 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 33 लाख 74 हजार 261 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 26 लाख 19 हजार 306 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 54 हजार 955 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 4 हजार 458, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 62 हजार 364, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 27 हजार 043, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 11 लाख 66 हजार 421 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 3 लाख 10 हजार 12, 1 हजार 377 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 586 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहिम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.
आज लसीकरण बंद राहणार -
मुंबईत लसीकरण मोठ्या संख्येने होत असल्याने तसेच लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीचा तुटवडा असल्याने आज गुरुवारी 3 जून रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लसीचा साठा आल्यावर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 3,04,458
फ्रंटलाईन वर्कर - 3,62,364
जेष्ठ नागरिक - 12,27,043
45 ते 59 वय - 11,66,421
18 तर 44 वय - 3,10,012
स्तनदा माता - 1,377
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 2,586
एकूण - 33,74,261