महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Patra Chawl Scam Case : संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याबाबत ईडीच्या पदरी निराशा; आता पुढील... - patra chawl scam case court hearing

संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या पत्राचाळ प्रकरणात जामीन रद्द करण्यासंदर्भातील ईडीच्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता 15 मार्च रोजी इडीच्या याचीकेवर सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या काही कंपन्या होत्या. यातील काही कंपन्यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Patra Chawl Scam Case
Patra Chawl Scam Case

By

Published : Mar 2, 2023, 4:43 PM IST

Updated : Mar 2, 2023, 5:17 PM IST

मुंबई :संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या बाबत पत्राचाळ प्रकरणी उच्च न्यायालयाने जामीन रद्द करण्याबाबत ईडीची याचिका सुनावणी तहकूब केली. आता 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊतच्या मालकीच्या काही कंपन्या होत्या. त्यातील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पत्राचाळ घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकल्पात संजय राऊत यांनीही खूप स्वारस्य घेतले होते.

जामीनाला आव्हान :त्यातूनच घोटाळा करून कमावलेल्या पैशांपैकी तीन कोटी २७ लाख रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. या प्रकारचा आरोप संजय राऊय यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन दिला. त्या जामीनाला आव्हान अंमलबजावणी संचालयाने दिले आहे त्या संदर्भातली आजची सुनावणी न्यायमूर्ती बोरकर यांनी तहकूब केली.


ईडीवर चिकित्सक शेरे :गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी खूप स्वारस्य घेतले होते. मात्र, त्या प्रकल्पाच्या घोटाळ्यात त्यांनी छुप्या पद्धतीने सहभाग घेतला. प्रवीण राऊत याना पुढे करून त्यांनी या घोटाळ्यात भाग घेतला. याप्रकरणी आम्हाला आणखी बराच तपशील मिळत असून, अद्याप तपास सुरूच आहे,' असा आरोप मांडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विरोध केलाच होता. मात्र, अंमलबजावणी संचालयाने जामीन देताना आपल्या निकाल पत्रामध्ये ईडीवर चिकित्सक शेरे देखील मारले होते.


सुनावणी 15 मार्चला : त्यानंतरही अंमलबजावणी संचलनालय यांच्यातर्फे संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन तो रद्द करण्या संदर्भातली याचिका दाखल केली होती. या याचीकेच्या संदर्भातील सुनावणी आज न्यायमूर्ती बोरकर यांच्या एकल पिठापुढे सुरू झाली. याचीके संदर्भातला मुद्दा दोन्ही पक्षकारांनी उपस्थित केल्यावर अंमलबजावणी संचनानालय वतीने वकिलांनी संपूर्ण याचिकेसाठी दीड तास आणि काही काळ अवकाश हवा अशी याचना केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपशील न्यायालयामध्ये व्यवस्थित मांडता येईल, असे देखील ईडीवतीने म्हटले गेले. मात्र न्यायमूर्ती एन बोरकर यांनी सरकारच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन," आमच्या अनेक याचिकांचा ढीग असल्याचे दर्शवत आपण मागितलेला वेळ हा मिळणे कठीण आहे. त्यामुळे या संदर्भातली सुनावणी 15 मार्च 2023 रोजी ठेवण्यात आल्याचे" न्यायमूर्तींनी न्यायालयात नमूद केले.


ईडीच्या पदरी निराशा :पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्या संदर्भात अनेक आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या आरोपांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचलनाल्याने याचिकेचा पाठपुरावा सुरू ठेवला .मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात संजय राऊत यांना जामीन दिल्यानंतरही अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने या जामीनाला विरोध देण्यासाठी भरपूर तयारी केल्याचे एकूणच या सुनावणीच्या दरम्यान स्पष्ट झाले. मात्र यावेळी देखील ईडीच्या पदरी निराशाच पडली. ईडीकडून या सुनावणीच्या वेळी देखील जामीन रद्द व्हावा. याच उद्देशाने तयारी केली गेली होती. परंतु न्यायालयातील प्रचंड प्रकरणांची स्थिती पाहता आणि वस्तुस्थिती पाहता न्यायालयाने ही सुनावणी अखेर पुढे ढकलली आहे.

हेही वाचा -Sanjay Raut: यापुढे कोणतीही निवडणूक होऊदेत नकली शिवसेनेचा प्रभाव कुठेच दिसणार नाही - संजय राऊत

Last Updated : Mar 2, 2023, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details