महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prem Paswan Murder Case : पाटणात खून अन् अटक मुंबईत; आठ महिन्यांपासून होता फरार - Prem Paswan Murder Case

Prem Paswan Murder Case : बिहारमधील पाटणा जिल्ह्यात असलेल्या परसा बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तो मागील आठ महिन्यांपासून फरार होता.

mumbai crime news
आरोपीला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 9:58 AM IST

मुंबई : Prem Paswan Murder Case : बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील परसा बाजार पोलीस ठाण्यात (Parsa Bazar Police Station) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी काही दिवसांपासून वॉन्टेड (Patna Accused Arrested in Mumbai) होता. या आरोपीविरोधात परसा बाजार पोलीस ठाण्यात IPC कलम 302, 120 ब, 34 आणि हत्यार प्रतिबंध कायदा कलम 27 सह एससीएसटी कायदा कलम 3(2)(5)(अ)(अं) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस गस्त घालत असताना कारवाई : 1 सप्टेंबरला पेट्रोलिंग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे आणि त्यांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की, साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Sakinaka Police) बिहार येथील एका गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी आला आहे. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याच्या निगराणी पथकाने अंधेरी घाटकोपर लिंक रोड येथील सोसायटीमध्ये या आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी केली असतचा त्यांने त्याचे नाव नवीनकुमार प्रियकुमार रंजन (वय 22) असे सांगितले. तो बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील दानापूर मुळगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले.

प्रेम पासवान हत्या प्रकरणातील आरोपी : आरोपीला अधिक चौकशीसाठी साकीनाका पोलीस ठाण्यात आणले. त्याची सखोल चौकशी केली असता, तो बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील प्रेम पासवान हत्या प्रकरणात वॉन्टेड आरोपी असल्याचे समोर आले. तो मागील आठ महिन्यांपासून फरार होता. परसा बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती त्याने दिली. त्याचप्रमाणे मागील 10 दिवसांपूर्वी तो मुंबईत आला असून, तो सोसायटी मज्जितजवळ असलेल्या ब्लॉसम डोरमेटी या ठिकाणी राहत होता.

पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल : आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा जिल्ह्यातील परसा बाजार पोलीस ठाण्यात संपर्क केला. प्रभारी अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाली की, भारतीय दंड संविधान कलम 302, 120 ब, 34 सह हत्यार प्रतिबंध कायदा कलम 27 आणि कायदा कलम 3(2)(5)(अ )(अं ) या कलमांन्वये आरोपीवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये नवीनकुमार प्रियकुमार रंजन हा वॉन्टेड आरोपी आहे. त्याबाबत अधिक माहितीची खात्री झाल्यानंतर या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी परसा बाजार पोलीस ठाण्याची एस्कॅटिंग टीम मुंबईत येत आहे. या आरोपीला परसा बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Thane Crime : नवऱ्याचा बायकोकडे 'त्या' कारणासाठी तगादा, वाद अन् थेट बायकोचा खूनच
  2. Thane Murder Case : धक्कादायक! अल्पवयीन बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहून भावाने केला खून, वाचा संपूर्ण प्रकरण
  3. Old Man Murder : वाळूचा टिप्पर अडविला म्हणून वृद्धाचा खून; तिघा बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details