मुंबई- ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याप्रमामे नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीही वाढू लागली. याच भीतीतून आता एंजाइटी डिसऑर्डर अर्थात दडपणाच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.
आपल्याला कोरोना होऊ शकतो. यामुळे आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका होऊ शकतो, या भीतीने काही जण दिवसभरात सॅनिटयझरच्या चार बटल्या संपवत आहे. दिवसभरातून दोनपेक्षा जास्तवेळा अंघोळ करत आहेत. कोरोना होईल, या भीतीने सतत हात धुवत आहेत. ही केवळ भीती नसून हा एक मानसिक आजार आहे. एंजाइटी डिसऑर्डर म्हणजे दडपण, असा मानसिक आजार होत आहे. या आजारामुळे दडपण वाढते. त्यामुळे भीती वाटून रक्तदाब वाढणे, जास्त भीती वाटणे, भीतीने घाम येणे, रक्तदाब वाढल्यानंतर श्वसनासही त्रास होणे, असा त्रास यामुळे होऊ शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.