मुंबई -कोरोनामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईतील काही प्रमुख रुग्णालयातील रुग्णांची संख्या खालावली आहे. टाटा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये नेहमी ३५०० पर्यंत रुग्ण तपासले जातात. मात्र, लॉकडाऊन असल्याने फक्त १७०० वर रुग्णांचा आकडा आलेला आहे. तसेच शस्त्रक्रिया विभागात देखील ५० टक्के घट झाली आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : मुंबईतील प्रमुख रुग्णालयातील रुग्णसंख्या खालावली, शस्त्रक्रिया विभागातही ५० टक्के घट - केईएम रुग्णालय
मुंबईमध्ये अतिशय महत्वाच्या अशा वैद्यकीय संस्था आहेत. त्यामध्ये देशातील महत्त्वाचे असे टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा आहे, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, आता वाहतुकीचा साधने नसल्याने टाटा आणि केईएम सारख्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
मुंबईसह देशभरात कोरोना थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मुंबई ठप्प झालेली आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर संपूर्ण देशातील वाहतुकीची साधने ठप्प झाली. तसेच रेल्वेला देखील ब्रेक लागला. त्यातच मुंबईमध्ये अतिशय महत्वाच्या अशा वैद्यकीय संस्था आहेत. त्यामध्ये देशातील महत्त्वाचे असे टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा आहे, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, आता वाहतुकीचा साधने नसल्याने टाटा आणि केईएम सारख्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वी जे रुग्ण उपचार घेत होते, त्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. सर्व काही बंद झाल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये अडकून राहावे लागले आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव आता रुग्णालयातील ओपीडीमधील रुग्णांच्या सेवेवर सुद्धा होऊ लागला आहे. टाटा रुग्णालयामध्ये लॉकडाऊन होण्यापूर्वी ३५०० पर्यंत रुग्ण तपासले जात होते. मात्र, लॉकडाऊनंतर हा आकडा १७०० वर आला आहे. तसेच या काळात टेलिकन्सलटींगची सुविधा रुग्णांना उपयुक्त ठरत आहे. शस्त्रक्रिया विभागात देखील ५० टक्क्यांची घट झाली असून रेडीएशन आणि केमो थेरपी विभागात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत रुग्णसंख्या खालावली आहे, असे टाटा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता खोब्रेकर यांनी सांगितले. आम्ही केईएम रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे वैद्यकीय अधिकारी भेट शकले नाहीत.