मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांसाठी मर्यादित वेळेत 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू झाली. राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कोरोना नियमावली तयार करण्यात आली. यामध्ये मास्क वापरणे प्रवाशांना बंधनकारक केले. मात्र, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनी लाखोंची दंड वसुली केली आहे. या कारवाईनंतर रेल्वे प्रवाशांना शिस्त लागल्याचे चित्र दिसत असून मोठ्या प्रमाणात प्रवाशी मास्क वापरताना दिसत आहेत.
मागील एक महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावरून 4 हजार 117 प्रकरणांची नोंद करण्यात आली. यातून 6 लाख 29 हजार 600 रुपयांची दंड वसुली करण्यात आली. राज्य सरकार, रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासनाद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर नियमावली तयार केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे, गर्दीचे नियोजन करणे, या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.
प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी क्लिनिक मार्शल पथकाची नियुक्ती केली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यावतीने विना मास्क प्रवाशांवर कारवाई करण्याचे सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत चर्चगेट ते डहाणू पर्यंतच्या मार्गावर 4 हजार 117 प्रकरणाची नोंद करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचीदेखील जोरदार कारवाई