मुंबई :वर्ष २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला नेरळ-माथेरान ट्रॅक (Neral Matheran Toy Train) पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने जोरदार प्रयत्न केले आहेत. (Matheran Tourist Spot) नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळसा घालणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि या मार्गावरील सेवा दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. अमन लॉज ते माथेरान दरम्यानच्या शटल सेवा आधीच प्रवासी (Passenger Response to Matheran Toy Train) आणि पार्सल घेऊन जाणाऱ्या सेवेत होत्या. टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी (Tourist Crowd in Matheran) अखंड आनंदात स्वागत केले आहे. (Latest news from Mumbai)
रेल्वे प्रशासनाला 3 लाखांचा महसूल :एकूण ३,०४,१९५ प्रवाशांना माथेरानचा प्रवास घडविण्यात आला असून त्यात एप्रिल ते डिसेंबर२०२२ या कालावधीतील अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या २,७६,९७९ आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीतील नेरळ आणि माथेरान दरम्यानच्या २७,२१६ प्रवाशांचा समावेश आहे. एकूण नोंदणीकृत महसूल रु. २,२०,९०,०२० आहे. ज्यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठीचे रु.१,८६,६३,३४८/- आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठी माथेरान - नेरळ दरम्यान रु. ३४,२६,६७२/- या व्यतिरिक्त या विभागात एकूण १०,९८३ पॅकेजेसची पार्सल वाहतूक करण्यात आली आहे. ज्यातून ३,०४,३२५/- रुपयांचा महसूल नोंदवला गेला आहे.
सुरक्षित आणि आरामदायी प्रवास :यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत ७,६१८ पॅकेजेसचा समावेश आहे. ज्यामधून रु.२,७९,८२३/- महसूल मिळाले असून ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत नेरळ आणि माथेरान दरम्यान आणि ३,३६५ पॅकेजेस मधून रु.२४,५०२/- महसूलाची नोंदणी झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.