महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकमान्य टिळक टर्मिनसवर रात्रीच्या गाड्यांना प्रवाशांची तोबा गर्दी

लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाश्यांची आज दिवसभर गर्दी होती. ती रात्री जाणाऱ्या गाड्यांनाही प्रचंड झालेली आहे. सकाळच्या गाड्यात ज्यांना जाता आले नाही ते रात्रीच्या गाड्यात जात आहेत.

Lokmanya Tilak Terminus
लोकमान्य टिळक टर्मिनसवर रात्रीच्या गाड्यांना प्रवाशांची तोबा गर्दी

By

Published : Mar 21, 2020, 1:09 AM IST

मुंबई - शहर व उपनगरात कोरोना विषाणूचे रुग्ण हळूहळू वाढत असल्याने राज्य सरकार सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी लोकल रेल्वे व बस सेवा बंद करतील व लांब पल्याच्या गाड्या अनिश्चित काळासाठी बंद होतील. या भीतीने गावी जाण्यासाठी असंघटित कामगार वर्ग उपनगरातील लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी करत आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर रात्रीच्या गाड्यांना प्रवाशांची तोबा गर्दी

हेही वाचा -कोरोनाचे थैमान : कस्तुरबा रुग्णालय 'हाऊसफुल', पालिकेच्या इतर रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड, ओपीडी सुरू

जगभरात हाहाकार उडवून दिलेल्या कोरोना विषाणूने राज्यात व मुंबईत विळखा घट्ट करीत असून, या विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता राज्य शासनाने शहरातील दुकाने , कार्यालय 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच सर्व शैक्षणिक संस्था व परीक्षाही 31 मार्चपर्यंत पुढे असल्यामुळे कदाचित मुंबईतील परिवहन सेवा बंद होईल किंवा मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे सेवा बंद करण्यात येतील की काय या भीतीने अनेक जण मुंबई सोडून बाहेर जात आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाश्यांची आज दिवसभर गर्दी होती. ती रात्री जाणाऱ्या गाड्यांनाही प्रचंड झालेली आहे. सकाळच्या गाड्यात ज्यांना जाता आले नाही ते रात्रीच्या गाड्यात जात आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून उत्तरेकडे व पश्‍चिमेकडे जाणाऱ्या गाड्या असतात. विशेषतः यात कामगार वर्ग जास्त असल्याचे पाहायला मिळते. सर्व व्यवहार बंद झाल्यावर रोजचा उदरनिर्वाह कसा होणार म्हणून, हे लोक आपल्या गावी जात आहेत. उत्तर भारतात जाण्यासाठी रोज जाणाऱ्या रेल्वे सह 4 विशेष रेल्वे या स्थानकावरून आज सोडण्यात येणार असल्याने ही गर्दी झाली आहे.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसारच - वर्षा गायकवाड

ABOUT THE AUTHOR

...view details